Rahul Gandhi Suspended: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात...

Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर (Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha) त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत. 

Updated: Mar 24, 2023, 03:13 PM IST
Rahul Gandhi Suspended: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात... title=
Rahul Gandhi

Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशातील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी ( Member of Lok Sabha) रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत (Maharastra Assembly) दिसून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस (Indian National Congress) जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे.

विधानसभेत काय घडलं?

विधानसभेत काँग्रेस नेत्यांनी केंद्रसरकार विरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं दुर्देवी असल्याचं मत नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबद्दल सरकारने सभागृहाला माहिती द्यावी, अशी मागणी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलीये. सभागृहात राष्ट्रवादीने याला विरोध केला. एकनाथ खडसे आणि शशिकांत शिंदे यांनी हे पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली.

कॅाग्रेसचा सभागृहात एकही आमदार उपस्थित नसल्याचं दिसून आलं. काँग्रेस (Congress) आमदार विधानभवन येथे मोदी सरकार विरोधात घोषणा सुरू केली. त्यावेळी मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार (Wayanad MP Rahul Gandhi) होते.

Priyanka Gandhi यांचा केंद्रावर निशाणा

देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? ती चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? असा सवाल प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांचं काय चुकलं?

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटक निवडणुकीदरम्यान एका रॅलीत भाषण देताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या रॅलीत बोलताना त्यांनी 'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?' असं प्रश्न केला होता. 5 वर्षानंतर निकाल देताना सूरत सेशल कोर्टाने राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्यांची खासदारकी रद्द झालीये.