मुंबई : Raj Thackeray News :मंदिरं लवकर खुली करा, अन्यथा मनसे मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करणार असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्य सरकारला यांनी दिला आहे. सरकार सोयीनुसार निर्बंध लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) प्रकरणावरही ते बोलले.
कोविड (Coronavirus) काळात सर्व गोष्टी पद्धतशीरपणे चालू आहेत. आता नारायण राणे यांच्याविरोधात जे झालं ते. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्यांचे मेळावे सुरु आहेत. परवा दिवशी, नाही. कालच कळलं की, भास्कर जाधव यांचा मुलगा. त्यांने मंदिरात जाऊन अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत. बाकीच्यानी मंदिरात जायचे नाही. यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घायचे आणि त्यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहिहंडी साजरी करायची नाही, असे राज म्हणाले.
कुठूनही गर्दी कमी झालेली दिसतेय का? सर्व मैदानावर फूटबॉल सुरु आहे. क्रिकेट सुरु आहे. मुंबईतील महापौर बंगल्यावरील बिडल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून येणाऱ्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेले नाही. फक्त या सणांवरतीच कसे काय तुम्ही येता? त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना सांगितले तुम्ही बिधनास्त दहिहंडी साजरी करा. जे होईल ते होईल, असे सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईतच कोरोनाचे निर्बंध का? यांची जन आशीर्वाद यात्रा चालली. यांचे मेळावे होत आहे. मेळाव्यावर निर्बंध का नाहीत. मेळाव्यातून आणि यांच्या हाणामाऱ्यांतून कोरोना पसरत नाही, का? फक्त जनतेला घाबरुन सोडले जात आहे. बाहेर पडला तर असं होईल आणि तसं होईल. केंद्र सरकारला केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच का दिसत आहे. इतर राज्यात कोविड निर्बंध का नाहीत, असा सवाल राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्बंधावरुन उपस्थित केला आहे.