एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावे, आपण सरकार आणूया- आठवले

चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार

Updated: Oct 7, 2020, 03:13 PM IST
एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावे, आपण सरकार आणूया- आठवले  title=

मुंबई : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावे, आपण आपले सरकार आणूया असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनी केले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. त्यांना जायचं असतं तर आधी जायला हवं होत. तेव्हा गेले असते तर आता मंत्री झाले असते. पण राष्ट्रवादीत आता सगळं फुल्ल असल्याचे आठवले म्हणाले.  

६ डिसेंबर निमित्त सह्याद्री गेस्ट हाऊस वर बैठक झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. कोरोना असल्याने ६ डिसेंबरला लोकांनी येऊ नये. सगळे सण घरातच साजरा करायचे आवाहन आठवलेंनी केले. चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांच्या टीकेवर रामदास आठवलेंनी बोलणं टाळलं. पवार साहेब चांगले मित्र आहेत. आदर स्थानी आहेत. त्यांना उत्तर देणार नाही. मी माझी भूमिका मांडत असतो असे ते म्हणाले. 

हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांनी आठवलेंवर टीका केली होती. टीकेला आठवलेंनी प्रत्युत्तर दिलंय. कंगनाच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. तिला मुंबई राहायचा अधिकार आहे म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहिलो. मी नटींच्या गर्दीत राहत नाही. मी कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो असे ते म्हणाले. 

हाथरसमध्ये मी जाऊन आलो, तुम्ही कधी जाणार आहात ? असा प्रश्न त्यांनी राऊतांना विचारलाय. हाथरस घटनेचा निषेधच करतो. आमच्या पार्टीनेही जागोजागी आंदोलन केले. परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना योगिनीं निलंबित केलंय. 

बीजेपीने सरकार विरोधात ८० हजार फेक अकाऊंट बनवले असतील तरी सरकारला ही अधिकार आहे की त्यांनी बीजेपी विरोधात १ लाख बनवा असा सल्ला आठवलेंनी दिलाय. ते त्यांची चाल चालत आहेत. आम्ही आमची चाल चालत आहोत असे आठवले म्हणाले.

महत्वाचे मुद्दे 

दादरमध्ये अनेक कोरोना केसेस आहेत
लोकांनी बाहेरून मुंबई ला येणं धोक्याचं आहे
यावेळी चैत्यभूमीवर कोणीही येऊ नये हे आवाहन
ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत तिथे हार घालावा
दीक्षाभूमी ला येऊ नये
दसरा, नवरात्रोत्सवची नियमावली बनवली आहे
हाथरसला पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली
कुटुंबाला आमच्याकडून निधी दिला आहे
अशी शिक्षा देऊ जे सगळे पाहतील असे तिथल्या सरकारचे आश्वासन
यावर राजकारण न करता असे अत्याचार रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे