आरपीआयकडून सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) सामाजिक सलोखा रॅली काढण्यात येणार आहे. 

Updated: Jan 18, 2018, 11:18 AM IST
आरपीआयकडून सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

मुंबई : कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) सामाजिक सलोखा रॅली काढण्यात येणार आहे. 

कधी असेल रॅली

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून येणाऱ्या 22 तारखेला ही रॅली काढण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले या रॅलीचं नेतृत्व करणार आहेत. 

रॅली कुठून कुठपर्यंत?

ही रॅली दादर, चैत्यभूमी ते नायगाव, सदाकांत ढवण मैदान अशी निघणार असून रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. दुपारी 2 वाजता ही रॅली निघणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. समाजातील सर्व घटकांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.