भाजप नेते प्रवीण दरेकर यांना दुसऱ्यांदा पोलिसांची नोटीस

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे.

Updated: Apr 9, 2022, 03:47 PM IST
भाजप नेते प्रवीण दरेकर यांना दुसऱ्यांदा पोलिसांची नोटीस title=

मुंबई : Mumbai Police notice to Praveen Darekar : भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांना मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना या नोटिसमधून देण्यात आल्या आहेत.

मुंबई बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून येण्यासाठी दरेकर यांच्यावर कामगार सोसायटीच्या बोगस सभासदत्वाचा वापर केल्याचा आरोप आहे. कामगार नसतानाही अशा संस्थांसाठी राखीव कोट्यातून ते बँकेवर गेले होते. 

याच तक्रारीच्या अनुषंगाने प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात येत आहे. याच प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस प्रवीण दरेकर यांना पाठविली आहे.