दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय. मुंबईत आजपासून कलम 144 लागू. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली. बुधवारी मुंबईत 24 तासांत अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ओमायक्रॉनचे 33 रुग्ण सापडले आहेत. राज्यात 3 हजार 900 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गृह विभागाने नवी नियमावली जाहीर केली आहे. (भयंकर! मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू - डॉ. शशांक जोशी)
शहरातील कोविड 19 आणि ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आजपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
आदेशात नमूद केले आहे की ते कोणतेही नवीन वर्षाचे कार्यक्रम होणार नाही. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बँक्वेट हॉल, दुकाने, दुकाने, दुकाने, दुकाने, दुकाने यासह कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत होण्यास मनाई करण्यात आली आहे. (या 7 गोष्टी कराल तर ओमायक्रॉन तुमच्या जवळही फिरकणार नाही)
बंदिस्त सभागृहात कार्यक्रमाला एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत परवानगी आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी फक्त 25 टक्के उपस्थितीची परवानगी आहे. समुद्रकिनारी, बागेत आणि रस्त्यावर गर्दी करू नये, असंही आवाहन केलं गेलं आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडू नये.मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि यासारख्या पर्यटन स्थळी गर्दी करू नये. (शाळांबाबत आरोग्यमंत्र्याचा मोठा निर्णय, कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर)
नव वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करू नये, मिरवणूक काढू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
अनेक जण नववर्षाचं स्वागत फटाके फोडून करतात. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी फटक्यांची आतिषबाजी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.