Air India News: कहर! कहर! कहर! एअर इंडिया (Air INDIA) विमानात 6 डिसेंबर 2022 रोजी घडलेला गैरप्रकार ऐकल्यानंतर आपल्या मनात फक्त हा एकच विचार घोळायला लागतो. सध्या विमानातही अशा प्रकारांची पुनरावृत्ती घडताना दिसते आहे. एका मद्यधुंद इसमानं चक्क एका महिलेवर लघुशंका केली होती. त्यामुळे सगळीकडेच या एका प्रकारानं खळबळ माजवून दिली होती. असला गैरप्रकार (Man Pee on Woman) करणारा हायक्लास व्यक्ती आहे तरी कोण? तु कुठून आलाय? तो करतो काय? याची सगळी माहिती आता जगासमोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. त्या व्यक्तीचं नावं आहे शंकर मिश्रा. तेव्हा जाणून घेऊया की हा शंकर मिश्रा नक्की आहे तरी कोण आणि त्यानं ते घाणेरडं कृत्य का केलं? (shankar mishra is the suspect man who did pee on an older lady know more who is he)
समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचं नावं शंकर मिश्रा असल्याचं बोललं जातं आहे. तो वेल्स फारगो (Wells Fargo) या कंपनीचा वाईस प्रसिडेट आहे. ही कंपनी अमेरिकेतील एका मोठ्या मल्टिनॅशनल फायनॅन्शियल सर्विसेस कॉर्पोशनशी जोडलेली आहे. शंकर मिश्रावर दिल्ली पोलिसांनी अश्लील चाळे (Crime News) करण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कळते की, दिल्ली पोलिस स्टेशनवर याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर मात्र हा शंकर मिश्रा मुंबईला पळून गेला आहे आणि त्याला शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी टीम पाडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मिश्रा हा मुंबईचा राहणारा आहे. त्याला शोधण्यासाठी मुंबईत पोलिसांनी टीम्स नेमल्या आहेत. त्याचबरोबर तो फरार असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला त्वरित शोधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शंकर मिश्रावर आयपीसी 294, 354, 509 आणि 510 अंतर्गत (IPC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एअर इंडिया फ्लाईट 142 हे विमानं पॅरिस ते दिल्ली मार्गे प्रवास करत होते. या विमानात बिझनेस क्लासमध्ये एका वृद्ध महिलेवर चक्क एका सुशिक्षित प्रवाशानं लघुशंका केली होती. या आधी न्यूयॉर्क ते दिल्ली मार्गे प्रवास करणाऱ्या विमानातही असाच एक प्रकार 26 नोव्हेंबर रोजी घडली होती.
6 डिसेंबर 2022 रोजी ही घटना घडली त्यानंतर 28 डिसेंबरला या कृत्यासाठी त्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतक्या उशीरानं या गैरप्रकारावर कारवाई का करण्यात आली यावर व्यवस्थापनानं प्रश्न उभा केला आहे. या दोन्ही प्रकरणात डीसीजीनं विमान कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी नोटीस जारी केली आहे.