Thackeray Group Vs Shinde Group : शिंदे गट आणि ठाकरे गट(Thackeray Group Vs Shinde Group) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. पक्ष कार्यालयावरुन दोन्ही गटांमध्ये वाद सुरु आहे. शिंदे गट थेट मुंबई महापालिकेत घुसला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul shewale) यांनी केला आहे. शितल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते.
विधानसभेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटानं ताबा मिळवल्यानंतर आता शिंदे गटानं मुंबई महापालिकेतील कार्यालयावरही ताबा मिळवला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबई महापालिकेत दाखल झाले. आत घुसून त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालयावर ताबा मिळवला. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढले. यामुळे मुंबईतील राजकारण चांगलेच पेटेले आहे. मुंबई महापालिका मुख्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचे पहायला मिळाले.
मुंबई महापालिका निवडणुका तोडांवर आल्या असताना शिंदे गट आक्रमक झाला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यातच मुंबई महापालिकेतील मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आक्रमक झालेला दिसत आहे. पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.
मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर, मुंबई महापालिकेत दाखल झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणा बाजी केली.
पक्षाचे नाव, पक्ष चिन्ह आणि पक्ष कार्यालय मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात चढाओढ पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्यासब तब्बल 40 गेल्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. रातोरात राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात शिवसेना पक्ष विभागला गेला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असा नवा राजकीय संर्घष सुरु आहे. शिवसेना पक्षाचे नाव, शिवसेना पक्षाची निशाणी धनुष्यबाण यावरुन दोन्ही गटात वाद सुरु असून या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. अशात शिवसेना पक्ष कार्यालयावारुन देखील दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरु आहे. विधानसभेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटानं ताबा मिळवल्यानंतर आता त्यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर लक्ष केंद्रीत केले आहे.