कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : मोठ्या राजकीय घडामोडींनंततर राज्यात सत्तापालट झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) सत्तेत आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली आहे. पण खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही कायम आहे.
हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी आता शिंदे गटाने मास्टर प्लान तयार केला आहे.
मुंबईत शिंदे गट आता नवं 'सेनाभवन' उभारणार आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नवा 'मास्टर प्लॅन' तयार केलाय. त्यानुसार दादरमध्येच नवं 'सेनाभवन' (SenaBhavan) उभारणार येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दिलीये. एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहाता त्यांना एका चांगल्या कार्यालयाची गरज आहे आणि तशा प्रकारचं कार्यालय दादर परिसरातच शिंदे यांचं मुख्य कार्यालय असेल अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे
मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाचं राज्य आहे, हे साफ चुकीचं आहे, हा आभास निर्माण केला जात आहे, मुंबईतल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. मुंबई ठाकरेंचा गड बोलतात ते साफ चुकीचे आहे असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.
याशिवाय नविन विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांचीही नियुक्ती केली जाणार आहे, त्यांच्याही स्वतंत्र शाखा असतील, या शाखांच्या माध्यमातून मुंबईतल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहितीही सरवणकर यांनी दिली.
विर सावरकर मार्गावर सिध्दीविनायक मंदिर, बाळासाहेब यांचे स्मारक, सावरकर स्मारक, चैत्यभूमी, चर्च, मस्जिद आहेत यासाठी वरळी प्रमाणे दादार प्रभागा मध्येही सुशोभीकरण व्हावे म्हणुन ठाकरे सरकार कडून निधी मागितला होता तो नाकारण्यात आला होता. पण शिंदे सरकारने आठ दिवसात तो मंजूर केलाय असंही सरवणकर यांनी सांगितलं.