Shiv Sena President News : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी (Maharashtra News in Marathi) आजचा दिवस खूप महत्त्वाचा (Political News) आहे. कारण या दोन्ही गटांमध्ये शिवसेना पक्ष कोणाचा ही लढाई सुरु आहे. शिवसेनेतीली हा वादा निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे त्यांचा निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपला आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना पक्ष प्रमुख कोण (Shiv Sena President) असणार, उद्धव ठाकरेंची खुर्ची कायम राहणार की जाणार याकडे सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. राज्याचे (Maharashtra Politics News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
जरी आज पक्षप्रमुखपदाचा आज कार्यकाल संपला असला तरी ठाकरे समर्थकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्ष प्रमुख आहेत आणि राहतील, असं स्पष्ट उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी केलं आहे. शिवाय पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारी आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. (Shiv Sena party chief Uddhav Thackerays term has ended 23 january 2023 who will be the Next president of shiv sena Eknath Shinde Politics bal thackeray birth anniversary News Mumbai marathi news)
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची असा प्रश्न राज्यात पडला आहे. हा वाद आयोगाकडे आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. आता जर काही निवेदन असेल तर त्यांना 30 जानेवारीपर्यंत सादर करण्यासाठी आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे यावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोग आपला निर्णय सांगणार.
2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या फेरनिवडी करण्यात आली. त्यावेळी कोणीही त्यांचा निवडीवर प्रश्न उपस्थित केला नव्हता. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यानंतर शिवसेना कोणाची आणि सेनेचा पक्ष प्रमुख कोण असे प्रश्न उपस्थित झाले. खरं तर शिवसेनेच्या घटनेत 'प्रमुख नेते' पदाची तरतूद नाही, असं यु्क्तीवादात ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्या पदावर झालेली निवड अवैध आणि घटनाबाह्य असल्याचा दावा आयोगासमोर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती (bal thackeray birth anniversary) आहे. बाळासाहेब यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. तर 17 जानेवारी 2012 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. आज त्यांचा जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
Remembering Balasaheb Thackeray Ji on his birth anniversary. I will always cherish my various interactions with him. He was blessed with rich knowledge and wit. He devoted his life to public welfare.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2023
ट्विटरवर ते म्हणाले की, ''श्री बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचा आदर्श जोपासताना ते अविचल होतं. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.''