शिवसेनेचा दसरा मेळावा, 'या' कारणामुळे रामदास कदम उपस्थित राहणार नाहीत

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे

Updated: Oct 15, 2021, 06:19 PM IST
शिवसेनेचा दसरा मेळावा, 'या' कारणामुळे रामदास कदम उपस्थित राहणार नाहीत title=

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहिले आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. (Shiv Sena's Dussehra Melawa in Mumbai) 

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री आणि नेते दसऱ्याला मेळाव्याला उपस्थित आहेत. 

पण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम मात्र दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा
आहे. ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना पक्षाची बदनामी होत असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. 

पण, आपल्या उपस्थितीबाबत स्वत: रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ऑक्सिजनवर असल्याने डॉक्टरांनी कुठेही न जाण्याचा सल्ला दिल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. शिवाय येत्या 10 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार  असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय