डीएसकेच नव्हे तर हे दोन बिल्डर्सही आले गोत्यात

डीएसकेंनतर आता भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. 

Updated: Nov 16, 2017, 05:33 PM IST
 डीएसकेच नव्हे तर हे दोन बिल्डर्सही आले गोत्यात title=

मुंबई : पुण्यातील बिल्डर डिएसके यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान अजून दोन मोठे बिल्डर्स सरकारी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. या तिनही या कंपन्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात येणार आहे.

फसवणुकीच्या तक्रारी 

मुंबई , पुण्यात असलेल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्पांतील घर मालकांना नियोजीत वेळेक घरांचा ताबा दिला नाही.  गृहप्रकल्पांतील घरांचा ताबा न दिल्याने गेले काही दिवस डीएसकेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. आता भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. 

निर्धारित वेळेत ताबा नाही 

 या तिनही बिल्डर्सआलेल्या मालमत्ता आणि व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. या तिनही विकासकांच्या गृहप्रकल्पांमध्ये घरे खरेदी केली होती. पण निर्धारित वेळेत त्यांना घरे उपलब्ध झाली नाहीत. 

महत्त्वाची बैठक

बुधवारी रात्री ग्राहक, मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली होती.  गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

विकासकांविरोधात तक्रारी 

या विकसकांविरोधात ग्राहकांनी मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीच्या तक्रारींमूळे यांच्याविरुद्ध आक्रमक पाऊले उचलली जाणार आहेत.