Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी समुद्रामध्ये अदनच्या खाडीपर्यंत पसरलेल्या समुद्रामध्ये कमांडो तैनात करण्याबरोबरच 10 युद्धनौकाही तैनात केल्या आहेत.
भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार यांनी 'सीएनएन-न्यूज 18'ला दिलेल्या माहितीनुसार, कमांडो एमव्ही लीला नॉरफॉक जहाजाचं अपहरण केल्याच्या प्रकरणाचा तपास भारतीय नौदल करत आहे. या क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरावरही भारतीय नौदल लक्ष ठेऊन आहे. या युद्धनौकांवर मारकोस कमांडोही तैनात करण्यात आल्याचं सांगितला जत आहे. भारतीय नौदल हिंदी महासागरामधील स्थायी शक्ती असून भारताच्या राष्ट्रीय हितांचं संरक्षण करण्यासाठी आणि या भागाचं स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि जागतिक व्यापार सुरळीत राहण्यासाठी भारत कोणतंही पाऊल उचलू शकतो असं सांगण्यात आलं आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार आनुधिक समुद्र सुरक्षा मोहिमेअंतर्गत भारताकडून स्वतंत्रपद्धतीने राबवलं जात आहे. तसेच भारताने डिसेंबर महिन्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तांबड्या समुद्रापासून सुरु झालेलं बहुराष्ट्रीय 'ऑप्रेशन प्रोस्पॅरिटी गार्डियन'मधून माघार घेतली होती. यमनमधील विद्रोही गटांनी सामान्य नागरिक आणि लष्करी हजारांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर डिसेंबरमध्ये अमेरिकेने ही मोहिम हाती घेतली होती.
याच कारणामुळे व्यापारी माल वाहून नेणारी हजारांवर समुद्री चाच्यांचे हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. भारताने अरबी समुद्रामध्ये आपलं वर्चस्व कायम राखण्यावर जोर दिला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताची भूमिका अरबी समुद्रात आपली स्थिती स्थिर करण्यावर आणि समुद्रातील सुरक्षा वाढवण्यास मदत करण्याची आहे.
आयएनएस कोच्चि, आयएनएस कोलकाता, आयएनएस मोरमुगाओ, आयएनएस चेन्नई, मल्टी-रोल फ्रिगेट आयएनएस तलवार आणि आयएनएस तरकश या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. हवाई सुरक्षेच्या दृष्टीने डोर्नियर आणि हेलीकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत.