मुंबई: अयोध्या दौऱ्यामध्ये हिंदीत भाषण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कसून तयारी करत आहेत. हिंदी शब्दांचे व्यवस्थित उच्चार आणि हिंदी भाषेतून प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी त्यांचा सराव सुरु आहे.
प्राध्यापक विनय शुक्ल हे उद्धव ठाकरेंना हिंदी भाषेचे धडे देतायत. येत्या २४ नोव्हेंबरपासून उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. २५ नोव्हेंबरला ते रामजन्मभूमी जागेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते संत-साधूंच्या भेटीगाठी घेतील. यावेळी उद्धव अयोध्येत जाहीर सभादेखील घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांची ही राज्याबाहेरील पहिलीच मोठी जाहीर सभा असेल.
या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे नेते यापूर्वीच अयोध्येत दाखल झालेत.