दिनेश दुखंडे / मुंबई : पक्षात राजकीय अस्तित्वाबाबत कोंडी झालेल्या भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डिवचलेय. या जन्मातील कर्माचे फळ या जन्मातच फेडायचे असते याची आठवण उद्धव यांनी खडसे यांना करून दिलीय. आजच्या 'सामना' संपादकीमध्ये ठाकरेंनी खडसेंना खडे बोल सुनावले.
या घोषणेनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेसाठी खलनायक ठरले. गेली तीन वर्षं खडसेंविषयी शिवसेनेत प्रचंड सुप्त राग आहे. या काळामध्ये शिवसेना नेते आणि खडसे यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकीही झाल्या. पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पहिल्यांदा मंत्री पद सोडावं लागलं आणि गेली दीड वर्षं राजकीय अस्तित्वाबाबत कोंडी झाल्यानं खडसे अवस्थ आहेत..त्यामुळे त्यांच्यावरचा वचपा काढताना आता शिवसेनेला गुदगुल्या होतायत. उद्धव ठाकरे यांनी आज मुखपत्र 'सामना'तून खडसेंवर ठाकरी शैलीतूीन बाण मारलेत.
मुक्ताई नगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना 'खतम' करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला, तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे.या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते.खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना 'खुली' ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच, असा टोलाही लगावण्यात आलाय.
खडसे यांची त्यांच्या भाजपमध्येच परिस्थिती इतकी बिकट झालीय की त्यांचं पुनर्वसन कधी होणार याची शाश्वती खुद्द त्यांच्या पक्षातले नेतेही ठामपणे देऊ शकत नाही.विधिमंडळ असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम अस्वस्थ एकनाथ खडसे स्वकीयांनाच अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे खडसेंचं काय करायचं, याचा निर्णय लवकरच भाजप नेतृत्वाला घ्यावा लागणार आहे.