मुंबई: घर, जागा, किंवा कपडे आतापर्यंत भाड्यानं मिळत असल्याचं पाहिलं असेल. अगदी काम करण्यासाठी काही कामगार किंवा मजूरपण भाड्यानं दिवसावर काही ठिकाणी मिळत असल्याचं ऐकलं असेल. पण बॉयफ्रेंड भाड्य़ानं मिळात असल्याचं कधी ऐकलं आहे का? हे ऐकूनही आश्चर्य वाटेल. पण होय खरंच व्हालेंटाइन डे साजरा करण्यासाठी आता तुम्हाला बॉयफ्रेंड भाड्यानं मिळणार आहे.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणांनी 14 फेब्रुवारीची तयारी सुरू केली आहे. 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत दररोज एक दिवस साजरा केला जातो. प्रपोज डे, चॉकलेट डे. पण अशा काही तरुणी असतील की ज्यांना बॉयफ्रेंड नसेल त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
गेल्या तीन वर्षांपासून एक तरुण व्हॅलेंटाईन डे निमित्तानं भाड्यानं बॉयफ्रेंड म्हणून तरुणींना वेळ देण्याचं काम करत आहे. शकुल असं या तरुणाचं नाव आहे. ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण शकुल गेल्या 3 वर्षांपासून हे काम करतो. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या पेजवर लिहिताना शकुलनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'माझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड नव्हती. पण मी एकदाच कुणालातरी होकार देण्याची खूप इच्छा आहे. जेव्हा माझे मित्र आपल्या गर्लफ्रेंडसोबत डेटवर जायचे तेव्हा मी खूप दु:खी असायचो. पण आता सगळं काही बदललं आहे.'
शकुल गेल्या 3 वर्षांपासून रेंटवर बॉयफ्रेंड म्हणून राहिला आहे. गेल्या 3 वर्षांत 45 महिलांना त्यानं डेट केलं.
'जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा एकटेपणा कुठेतरी हरवलेला असतो. माझ्या या प्रयत्नांमुळे दोघांनाही आनंद मिळतो, अगदी काही क्षणांसाठीच का असेना तरीसुद्धा हा आनंद लाख मोलाचा असतो हे महत्त्वाचं आहे. माझ्या आयुष्यात जोडीदाराची कमतरता असली तरी पूर्वीसारखे वाईट दिवस नक्कीच नाहीत' अशी भावना शकुलनं व्यक्त केली आहे.