मुंबई : मुलींवर अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. मात्र मुलींच्या या त्रासात अजून एकाची भर पडली ती म्हणजे सोशल साईट्सवर अश्लील फोटो शेअर करणे. मुलींच्या असुरक्षिततेत वारंवार वाढ होत आहे.
अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. क्लिनिकमध्ये एका तरुणासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि ओघाने प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेणार तोच मुलाचा खोटेपणा उघडकीस आला. त्यामुळे मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग आल्याने त्या तरूणाने अश्लील फोटो बनावट फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केले. हा प्रकार समजतास तरूणीने एमआरएमार्ग पोलीसात तक्रार केली. यावरून पोलीस अधिक तपास करत आहेत.
एमआरएमार्ग परिसरातील एका क्लिनिकमध्ये २८ वर्षीय तरुणी नोकरी करते. याच क्लिनिकमध्ये तिची नितीन वर्मासोबत तिची ओळख झाली. त्याने आपल्या वडीलांचा डायमंटचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मात्र कालांतराने हा तरूण खोटे बोलत असून तो बेरोजगार असल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने लग्नाला नकार दिला. याचा राग आल्याने त्याने तिच्या फेसबुक पासवर्डच्या आधारे तिचे नवे फेसबुक प्रोफाईल बनवून तिचे अश्लील फोटो व्हायरल केले.