'कांचा चिना' एवढा अजस्त्र का?

डोईला टक्कल असलेल्या, भेदक नजर आणि राक्षसी देहाच्या संजय दत्तला तुम्ही अग्निपथच्या प्रोमोजमधून पाहिलंच असेल. हृतिक रोषनही त्याच्यापुढे चिमुकला ठरावा, इतकी भीमकाय काया संजय दत्तने या सिनेमासाठी कमावली आहे. हिरोपेक्षा खलनायक इतका ताकदवान आणि अजस्त्र दाखवण्यामागे कारण काय ?

Updated: Dec 24, 2011, 11:12 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

१९९०च्या अमिताभ बच्चनच्या अग्निपथमध्ये डॅनी डेग्झाँपाने वठवलेली कांचा चिनाची भूमिका संजय दत्त येणाऱ्या ‘अग्निपथ’मध्ये साकारत आहे. काळ्या कपड्यातला, हातभर टॅटू असलेला आणि कानात चांदीची जाड डूल घातलेला संजय दत्त पाहूनच भल्याभल्यांना धडकी भरेल.

 

डोईला टक्कल असलेल्या, भेदक नजर आणि राक्षसी देहाच्या संजय दत्तला तुम्ही अग्निपथच्या प्रोमोजमधून पाहिलंच असेल. सहा फुटी, तगडा, पीळदार शरीरयष्टीचा हृतिक रोषनही त्याच्यापुढे चिमुकला ठरावा, इतकी भीमकाय काया संजय दत्तने या सिनेमासाठी कमावली आहे. पण, हिरोपेक्षा खलनायक इतका ताकदवान आणि अजस्त्र दाखवण्यामागे कारण काय ?

 

याबद्दल संजय दत्तला विचारलं असता तो म्हणाला, “जर तुम्ही बॅटमॅन,स्पायडरमॅन यांसारखे सुपरहिरोजचे सिनेमे पाहिले तर त्यातला खलनायक हा प्रचंड ताकदीचा असतो. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे, यामुळेच शेवटी अशा खलनायकाला मारल्यावर हिरो जास्त प्रभावी आणि शक्तीशाली ठरतो. मी हाच विचार सिनेमाच्या दिग्दर्शकाला सांगितला. त्यानेही याच पद्धतीने मग कांचा आणि विजय यांची कॅरेक्टर्स बनवली गेली.”