'...आणि सोनिया गांधी रडल्या'

उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या. सोनिया गांधी रडल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.

Updated: Feb 10, 2012, 06:49 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या. सोनिया गांधी रडल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.

 

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा  १९ सप्टेंबर२००८ च्या बाटला हाऊस एन्काऊंटरचा मुद्दा समोर आणला आहे. दरम्यान केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरची छायाचित्रे दाखविली. ही छायाचित्रे दाखविण्यामागे त्यांनी मी एक काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. हीच छायाचित्रं पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या  डोळ्यात अश्रू आले होते, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.

 

 

मी सोनिया गांधी यांना छायाचित्रे दाखविली होती. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधानांशी चर्चा करण्यास सांगितले होते. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचेही ठरविले होते. मात्र, निवडणुकीनंतर आणि हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने पुढे काहीच होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण खुर्शीद यांनी दिलं आहे.

 

 

दरम्यान,  काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह यांनी हे एन्काऊंटर बनावट असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचवेळी गृहमंत्री पी. चिदंबरम आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे एन्काऊंटर खरं असल्याचं म्हटलं आहे.