Rahul Dravid Car Accident: भारताचा माजी कर्णधार आणि 2024 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कारला लोडिंग ऑटोने धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये घडली. या छोट्याशा अपघातानंतर राहुल द्रविड लोडिंग ऑटोच्या चालकाशी वाद घालताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लोडिंग ऑटोला धडकल्यानंतर राहुल द्रविडच्या कारला डेंट पडला. या घटनेनंतर तो ड्रायव्हरवर चांगलाच संतापलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये राहुल द्रविड स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त करत असून कारला झालेल्या डेंटबाबत ऑटोचालकाला बोलत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडी ओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहरातील कनिंगहॅम रोडवर घडली.
हे ही वाचा: क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी 'ही' टीव्ही रिपोर्टर झाली मुस्लिम, प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत!
रिपोर्टनुसार, लोडिंग ऑटोने माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडच्या कारला मागून धडक दिली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, लोडिंग ऑटो त्याच्या कारला धडकल्यानंतर राहुल द्रविड खाली उतरला आणि त्याचे नुकसान तपासत असल्याचे दिसत आहे. या घटनेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ऑटोचालक यांच्यात थोडी बाचाबाचीही झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेसंदर्भात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Rahul Dravid’s Car touches a goods auto on Cunningham Road Bengaluru #RahulDravid #Bangalore pic.twitter.com/AH7eA1nc4g
— Spandan Kaniyar (@kaniyar_spandan) February 4, 2025
हे ही वाचा: 71 वर्षांपूर्वी प्रयागराज कुंभमध्ये असं काही घडलं होतं की, आठवण करून आजही होतो थरकाप
राहुल द्रविड हा टीम इंडियाचा दमदार खेळाडू आहे. त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.17 च्या सरासरीने 10889 धावा केल्या आहेत ज्यात 12 शतके आणि 83 अर्धशतकांचा असा धावांचा समावेश आहे. 153 धावा ही त्याची या कालावधीत त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. तर राहुल द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या आहेत ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 5 द्विशतके झळकावण्याचा विक्रमही राहुल द्रविडच्या नावावर आहे. राहुल द्रविडची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 270 धावा होती. राहुल द्रविडने भारतासाठी 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 31 धावा केल्या आहेत.