5 कोटींचे 6 कोटी मिळण्यासाठी बँक मॅनेजरने बँकेतूनच पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भंडाऱ्यातील घटनेने खळबळ उडाली आहे. हवाला रॅकेटचा पैसा असल्याची चर्चा होत आहे. पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडून भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील अॅक्सीस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतील 5 कोटी रूपये काही व्यक्तींना परस्पर दिले.
कुठलाही विड्रॉल करण्यात आला नाही. हे पैसे शहरातील एका राजकमल आर्ट ड्रायक्लिनर्स च्या दुकात ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी राजकमल आर्ट ड्रायक्लिनर्स या तुकानात धाड टाकत पाच कोटी रूपये जप्त केले आहे. तर या प्रकरणी 9 लोकांना तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक दृष्ट्या बँक मॅनेजर याला पाच कोटी रुपयांच्या मोबदल्यात 6 कोटी रूपये मिळणार असल्याने त्याने बँकेतील पैसे परस्पर काही लोकांना दिले असल्याची माहिती संगाण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी गोंदिया, छतीसागड येथील असून हा हवालाचा प्रकार तर नाहीना असा संशय व्यक्त केला जात आहे. अजूनही पोलीस स्टेशन तुमसर येथे आरोपींची कसून चौकशी सुरुच आहे.