www.24taas.com, नवी दिल्ली
देशातल्या विविध बॉम्बस्फोटांमधले फरार आरोपींना पकडण्यात एनआयएला अपय़श आल्याचं समोर आलं आहे. या आरोपींना पकडण्यासाठी चक्क वृत्तपत्रात जाहिरात देण्याची नामुष्की एनआयएवर ओढवली आहे.
समझौता एक्स्प्रेस, मक्का मस्जिद, अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी संदीप डांगे याच्यासह इतर आरोपींना पकडण्यासाठी तब्बल १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. अजमेर शरिफ स्फोटातील आरोपी मेहुल उर्फ महेश भाई याचा एनआयएला अजूनही छडा लागलेला नाही. त्याला पकडून देणाऱ्यास २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं गेलं आहे. तर मालेगाव बॉम्बस्फोटातील तसंच अजमेर शरिफ स्फोटातील आणखी तीन आरोपींविषयीची माहितीही एनआयएनं वृत्तपत्रात दिली आहे.
या आरोपींना पकडून देणाऱ्यास तब्बल १० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तर समझौता एक्स्प्रेस स्फोट आणि अजमेर शरीफ स्फोट प्रकरणातला आणखी एक आरोपी अमित उर्फ अमित तोतला याला पकडून देणाऱ्यास २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
एकूणच एनआयएच्या अधिकाऱ्यांचं जाळं देशभर असलं तरी या आरोपींना जेरबंद करण्यात NIA अद्यापही अपयशीच ठऱली आहे आणि म्हणूनच आता चक्क वृत्तपत्रात जाहिरात देण्याची नामुष्की एनआयएवर आल्याचं म्हटलं जात आहे.
[jwplayer mediaid="45216"]