कनिमोळी होणार का तुरूंगातून मोकळ्या?

टुजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी तिहार जेलची हवा खात असलेल्या डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांना आज जामिन मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शुक्रवारी दिल्ली हायकोर्टापुढे आलेल्या याचिकेवर कोर्टाने सुनावणीसाठी आजची तारीख दिली आहे.

Updated: Nov 28, 2011, 06:29 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

टुजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी तिहार जेलची हवा खात असलेल्या डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांना आज जामिन मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शुक्रवारी दिल्ली हायकोर्टापुढे आलेल्या याचिकेवर कोर्टाने सुनावणीसाठी आजची तारीख दिली आहे. या खटल्यात आतापर्यंत पाच आरोपींना जामिन मिळाल्यानंतर कनिमोळी यांच्यासह या घोटाळ्यात अडकलेल्या अन्य साथीदारांना सुटकेची आशा वाटू लागली आहे.

 

यात टेलिकॉम सेक्रेटरी सिद्धार्थ बेहूरा, फिल्म प्रोड्यूसर करीम मोरानी, कलैंगर टीव्हीचे एमडी शरद कुमार, कुसेगांव फ्रूट ऐंड वेजिटेबिल्स प्रा. लिमिटेड चे संचालक आसिफ बलवा आणि ए राजा यांचे सेक्रेटरी आर के चंडोलिया यांचा समावेश आहे.

 

या प्रकरणात आता पर्यंत युनिटेक लिमिटेडचे एमडी संजय चंद्रा, स्वान टेलिकॉमचे संचालक विनोद गोएंका आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रृपचे एक्झिकेटीव्ह हरी नायर, गौतम दोशी आणि सुरेंद्र पिपारा या पाच कॉर्पोरेट्सना जामिन मंजूर करण्यात  आला. त्यामुळे घोटाळ्यातील इतरही आरोपींना जामीन मिळावी अशी त्यांची मागणी आहे.