झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
रिटेल क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिल्याच्या मुद्यावरुन आजही संसदेत रणकंदन माजण्याची शक्यता आहे. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळं शुक्रवारी संसदेचं कामकाज ठप्प करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विरोधकांबरोबर युपीए आघाडीतील घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनंही या रिटेल क्षेत्रातील एफडीआयला विरोध केला. ममता बॅनर्जी यांनी विरोध केल्यानंतर मायावती आणि ममता बॅनर्जी यांनीही एफडीआयला विरोध केला. त्यामुळं आज संसदेत घमासन होऊ शकते.
त्यामुळं आज तरी कामकाज होणार का नाही, याविषयी शंका व्यक्त करण्यात येते. शुक्रवारी गोंधळामुळं संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यातच आज संसदेत FDI चा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. एफडीएला भाजपाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळं आजही सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून FDI चा मुद्दा गाजतो आहे. काही राज्यांनी याला सहमती दर्शवली, तर काही राज्यांनी याला तीव्र विरोध केला.