खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

Updated: Jun 9, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’चा प्रत्येक भाग प्रकाशित झाल्यानंतर चर्चेत राहताना दिसतोय. दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

 

आमिर खाननं आपल्या शोमधून डॉक्टरांची तसेच त्यांच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती. त्यानंतर आमिरने माफी मागण्यास नकार दिला होता. त्याचवेळी ३० जूनला प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या भागानं खाप पंचायतही नाराज झाल्याचं दिसतंय. खाप पंचायतीचे सदस्य असलेल्या काही सदस्यांना न रुचणारे प्रश्न यावेळी आमिरनं विचारले होते. हरियाणाच्या खाप पंचायतीच्या एका सदस्यावर हत्येसाठी मदत करण्याचा आरोप आमिरनं केला होता. यामुळेच तो खाप पंचायतीच्या नजरेत बोचत असल्याचं समजतंय.

 

मेहम चौबीसी या खाप पंचायतीचे अध्यक्ष रणधीर सिंह यांनी एका वर्तमात्रपत्राशी बोलताना म्हटलंय की, ‘आम्ही सामाजिक रितीरिवाज आणि परंपरा वाजवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच परंपरा कोणत्याही समाजाचा पाया असतात.’ यावेळी, मात्र याविषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी सत्यमेव जयतेच्या टीम थोडी टाळटाळ करताना दिसली.

 

.

 

.