www.24taas.com, अहमदाबाद
लोकसभा निवडणूक २०१४ ला सामोरं जाण्यासाठी विविध पक्षांची आणि नेत्यांची तयारी सुरू झालीय. आपली ‘इमेज’ सुधारण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याची तयारीही त्यांनी केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यापैकीच एक... त्याचाच एक भाग म्हणून मोदी आता लोकांसमोर येणार आहेत ऑनलाईन माध्यमातून...
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २४ ऑगस्ट रोजी देशवासियांच्या भेटीला येत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ते एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधणार आहेत. ‘गूगल प्लस हँगआऊट’वरून ते देशवासियांच्या प्रश्नांना ‘लाईव्ह’ उत्तरं देणार आहेत. हाच संवाद यूट्यूबवरही पाहता येणार आहे.
‘गुगल प्लस हँगआऊट’ हे गुगलचं एक असं अप्लिकेशन आहे ज्याद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त दहा लोकांना सामूहिक चॅटींग करता येऊ शकतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनीदेखील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी याच पर्यायाचा वापर केला होता. भारतात मोदींना या पर्यायाचा कितपत वापर होतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
.