मोबाईलचा थाट अन् खिशाला चाट

मोबाईल फोनचा भरपूर वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच मोबाईल कंपन्या कॉल रेटमध्ये ३० टक्के वाढ करणार आहेत.

Updated: Feb 2, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मोबाईल फोनचा भरपूर वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच मोबाईल कंपन्या कॉल रेटमध्ये ३० टक्के वाढ करणार आहेत. गेल्या दोन वर्षात मोबाईलचे ग्राहक ४०० दशलक्ष इतक्या संख्येने वाढले तरी वापर मात्र ४६५ मिनिटांवरुन ३५० मिनिटापर्यंत घसरला. आणि त्यामुळेच मोबाईल कंपन्यांना दर तीन महिन्याला जवळपास हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच सरकारने सर्कलच्या बाहेर रोमिंग सेवा उपलब्ध करुन दिल्याच्या कारणावरुन हजारो कोटी रुपयांचा दंड वसुल केला तो वेगळाच.

 

आता पुढील काळात कॉल करताना थोडं भान ठेवायला लागणार आहे. गेल्या काही वर्षात मोबाईल कंपन्यांमधल्या जीवघेण्या स्पर्धेत स्वस्तातले प्लॅनचे भरपूर पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. आता अत्यल्प किंमतीतल्या कॉल्सची ग्राहकांना सवय झाली आहे आणि ती अंगवळणी देखील पडली आहे. त्यामुळे हर एक फ्रेंडला जरूरी असेल तरच कॉल करत जा नाहीतर खिशाला चाट बसेल.