www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या काही वर्षांत सेवाकराच्या जाळ्यात अनेक वस्तू आल्या. सरकारच्या महसूलाच्या दृष्टीने सेवाकर महत्त्वाचा ठरु लागला. 1 जुलै 1994 ला मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना सेवाकराचा बोलबाला सुरु झाला.
सेवाकराच्या जाळ्यात दिवसेंदिवस वस्तूंची वाढच होतेय. 1994 ते 95 मध्ये सेवाकराच्या जाळ्यात तीन वस्तू होत्या त्यावेळी 410 कोटी महसूल मिळाला. पुढच्या वर्षी सेवाकराच्या जाळ्यात 6 वस्तू आल्या आणि 846 कोटींचा महसूल मिळाला. जनता दलप्रणित सरकारनं सेवाकराची व्याप्ती वाढवली 97-98 या काळात 18 वस्तू सेवाकराच्या जाळ्यात येऊन महसूल पंधराशे कोटीपर्यंत गेला.
पुढे एनडीएने तोच कित्ता गिरवला. 2003 मध्ये एनडीएच्या काळात सेवाकराच्या माध्यमातून 7890 कोटी इतका महसूल सरकारला मिळाला तर 62 वस्तू या जाळ्यात आल्या. त्यानंतर 2004 पासून आतापर्यंत युपीए सत्तेत आहे. 2011 मध्ये 97 हजार कोटींचा महसूल सरकारला मिळून 120 वस्तू सेवाकरात मोडतात.