हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

Updated: Jan 13, 2012, 08:49 PM IST

www.24taas.com, लातूर

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

पाच बाय पाच फुटाच्या बेड वरती अर्धा एकरावर हळद आणि आलं आणि तुरीचं आंतरपीक घेतलं. या लागवडीत त्यांनी एकुण अर्धा एकरावर हळदीची लागवड केली आहे. तर दीड एकरावर आल्याची लागवड झाली आहे. तुरीचं शुभम जातीचं बियाणे वापरलं आहे.

दोन एकरावरील या लागवडीपासून मोदी यांना तुरीचं ३० क्विंटल आल्याचं १५० क्विंटल तर हळदीचं ५० क्विंटल उत्पादन मिळणार असून यातून जवळपास ७ ते ८लाख रुपयांचं नफा मिळणार आहे.