पेट्रोलच्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे सखे सोबती असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही रस्त्यावर उतरली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात या दरवाढीविरोधात अभिनव आंदोलन केलं. एका हातगाडीवर मोटरसायकल ठेवून या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. पेट्रोलचे वाढते दर पाहता काही दिवसांनी गाड्याचा याच पद्धतीने वापर कराला लागेल, अशी मिश्कील टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.
या रॅलीच राष्ट्रवादीच्य़ा कार्यकर्त्यांनी सायकल चालवून सरकारचा निषेध केला. सरकारच्या निषेधात घोषणा करीत असताना नौपाडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. दरम्यान, सरकारची सहकारी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही खेळी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगतेय.