सुभाष भोईर यांचा धक्कादायक पराभव

शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य असलेल्या भोईरांनी आमदारकीचा राजीनामा देत सेनेत प्रवेश केला होता

Updated: Feb 17, 2012, 09:02 AM IST

www.24taas.com, ठाणे

 

शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य असलेल्या भोईरांनी आमदारकीचा राजीनामा देत सेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी संघर्ष झाल्यानंतर सुभाष भोईरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. ठाण्यात सेनेची सत्ता आल्यास महापौरपदी विराजमान होण्याचे भोईरांचे स्वप्न भंगले आहे.

 

ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ४५ मध्ये मिलिंद पाटील आणि ४५ अ मनाली पाटील विजयी झाले आहेत. ठाण्यात महापौर अशोक वैती विजयी झाले आहेत. ठाण्यात ४६ अ मध्ये प्रमिला किणी आणि ४६ मुकुंद किणी विजयी झाले आहेत. ठाण्यात प्रभाग क्रमांक १३ मध्ये अमित सरैय्या विजयी. काँग्रसेच्या मालती पाटील विजयी झाल्या आहेत.

 

ठाण्यात शिवसेनेचे सभागृह नेते पांडूरंग पाटील पराभूत झाले आहेत. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार अनिता गौरी विजयी झाल्या आहेत. ठाण्यात मिलिंद पाटणकर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या भरत चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीला १२ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे वॉर्ड क्रमांक ५१ मधील उमेदवार लक्ष्मण टिकमानी विजयी झाले आहेत.

Tags: