नक्षल्यांचा फतवा, लोकप्रतिनिधींना हटवा

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हत्या आणि इतर जाळपोळीच्या घटनाचे सत्र सुरूच ठेवले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यासाठी दबावाचं धोरण अवंबलंय. आता तर नक्षल्यांनी आणखी आक्रमक होत 'राजीनामे द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा' अशी धमकीच लोकप्रतिनिधींना दिलीय.

Updated: May 26, 2012, 11:30 AM IST

www.24taas.com, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी  हत्या आणि इतर जाळपोळीच्या घटनाचे सत्र सुरूच ठेवले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्यासाठी दबावाचं धोरण अवंबलंय. आता तर नक्षल्यांनी आणखी आक्रमक होत 'राजीनामे द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा' अशी धमकीच लोकप्रतिनिधींना दिलीय.

नक्षल्यांच्या या फतव्यामुळे धानोरा तालुक्यात प्रचंड दहशत पसरलीय. नक्षल्यांच्या भीतीमुळे लोकप्रतिनिधींच्या राजीनामा सत्राला सुरूवात झाली आहे. मुरूमगाव, कुलभट्टी आणि पन्नेमारा येथील सरपंचांसह १९ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रशासनाकडे सादर केलेत.

भामरागड,एटापल्ली,धानोरा,कोरची या तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्राम पंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांनी राजीनामे दिल्यामुळे काही ग्राम पंचायतीमध्ये चक्क प्रशासक नेमण्याची  पाळी प्रशासनावर  आलीय. जीवाच्या भितीमुळेच राजीनामा द्यावा लागत असल्याचं लोकप्रतिनिधी सांगतायेत

[jwplayer mediaid="108654"]