गडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !

पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्यांचा इतिहास पाहता त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.

Updated: Jan 12, 2012, 06:20 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समितींचा इतिहास पाहता  त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.

 

सहा महिन्यांपूर्वी बाजपच्या शहराध्यक्षपदी विकास मठकरींची निवड झाली आणि मुंडे, गडकरी गटांत वादाची ठिणगी पडली. स्वतः गोपीनाथ मुंडेंनी खडकवासला निवडणुकीत हटवादी भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात शहराध्यक्षांनी कार्यकारिणी घोषित करुन मुंडेंच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधली ही गटबाजी महाग पडणार असल्यानं दोन्ही गटाच्या नेत्यांना मुंबईत पाचारण करण्यात आलं. त्यात दिलजमाईची मात्र म्हणून १५ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी वेगळी समिती स्थापन करण्यात आली असली तरी शहर कार्यकारिणीही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त तिच्या अधिकारांवर काही मर्यादा आल्या आहेत.

 

पुणे शहर काँग्रेसमध्येही अशीच समस्या आहे. कलमाडी तिहार मुक्कामी गेल्यापासून नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून सामुहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला अस्तित्वात आला. याही समन्वय समितीत समन्वय नसल्याचंच पुढे आलं आहे. अशा परिस्थितीत भाजपनं अवलंबलेला फॉर्म्युला कितपत यशस्वी ठरतो याबाबत उत्सुकता आहे.