www.24taas.com, पिंपरी चिंचवड
पुण्यात स्कूल बसचालकांचा बेदरकारपणा पुन्हा समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूल बसनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या स्कूलबसला मागून धडक दिली आहे. यात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
चिंचवडच्या कृष्णनगरात हा अपघात झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन स्कूल बस धडकल्या आहेत. चिंचवडच्या कृष्णनगरमध्ये ही घटना घडली आहे. अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पण पुन्हा एकदा बस चालकांचा बेदरकारपणा समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी नेहमीच बस चालक खेळ करतात. अशी ओरड पालक करीत असतात. पार्किंगमध्ये उभ्या स्कूलबसला धडक दिली आहे.