झी २४ तास वेब टीम
[caption id="attachment_4874" align="alignleft" width="300" caption="जीमेलच बदलेलं स्वरुप"][/caption]
जीमेल म्हंटल की अगदी प्रोफेशनल वाटणाऱ्या ई-मेल साईटपैकी अशी एक साईट आजपर्यंत जीमेलने आपल्या ग्राहकांना नेहमीच नवनव्या सुविधा देऊन आपलसं केलं आहे. त्यामुळेच आता जीमेल तुमच्यासमोर येत आहे नव्या ढंगात आणि नव्या रंगात. व्हाइट स्पेस, नव्या थीम्स, अधिक सुविधा आणि सवोर्त्तम सर्च ऑप्शन हे नवे रुप आहे लोकप्रिय ई-मेल सेवा जीमेलचे. बुधवारपासून जीमेलने आपला नवा लूक युजर्ससाठी खुला केला असून इनबॉक्सवर दिसणाऱ्या ऑप्शनवर एक क्लिक केलं की ताबडतोब आपल्या अकाऊंटचा लूक बदलणार. थोडेदिवसांनी जीमेलचा हा नवा लूक डिफॉल्ट होणार असून सर्वांच्या मेलवर तो कायमस्वरूपी दिसणार आहे.
गुगलने आपल्या ब्लॉगवर याची घोषणा केली असून नवा लूक युजर्सच्या पसंतीस नक्कीच उतरले आणि जीमेल वापरताना युजर्स आणखी मजा लुटू शकतील अशी आशा, डिझायनर जासोन कॉर्नवेल यांनी सांगितले. नव्या लेआऊटमध्ये आपल्याला आपण एखद्या व्यक्तीशी केलेल्या सर्व कन्व्हरसेशनन्स पाहण्याची सोय असणार आहे. याचबरोबर आपण आपल्या अकाऊंटच्या सेटिंगमध्येही बदल करू शकतो. यामध्ये आपल्याला प्रेफरन्स मॅनेजर टूल वापरता येणार आहे. यामुळे आपण विविध मेल्स, जाहिराती ब्लॉक करता येणार आहे. याचबरोबर यामधील सर्च ऑप्शनमध्ये आपण जर एकदा एखाद्या व्यक्तीच्या नावाने सर्च केले तर ते कायम सेव्ह राहणार आहे. यामुळे पुन्हा आपण सर्च ऑप्शनमध्ये गेल्यावर केवळ एका क्लिकद्वारे आपण पुन्हा सर्च करू शकतो.
जीमेलच्या नव्या कन्व्हरसेशन बॉक्समध्ये आपल्या जीमेल प्रोफाइलवरील फोटोही दिसणार आहेत. यामध्ये गुगल कॉल्सची सेवाही उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्याला खऱ्याखुऱ्या कन्व्हरसेशनचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये आपल्याला आयस्टॉक फोटोजमधील नव्या थीम्स आणि बॅकग्राऊंड इमेजेस उपलब्ध होणार आहेत. जीमेलच्या नव्या लूक विषयी माहिती पाहिजे असेल तर https://mail.google.com/mail/help/intl/en/newlook.html वर लॉगइन करा.