याहू या सर्च इंजिन असलेल्या वेबसाइटवर ई-मेलचे खाते असणाऱ्यांनो सावधान कदाचित तुमचे खाते हॅक झाले असेल. हे खाते वापरणाऱ्या सुमारे साडेचार लाख जणांची माहिती आणि पासवर्ड हॅक केल्याचा दावा एका ऑनलाइन ग्रुपने केला आहे.
‘द आर्स टेक्निका’ या वेबसाइटने ही बातमी दिली आहे. 'डी33डीएस कंपनी' असे या ग्रुपचे नाव असून त्यांनी याहूवरील इमेल डीकोड डाटा चोरला आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
हॅकिंग केली गेलेली खाती याहूच्या 'व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल'मधील (व्हीओआयपी) आहेत. 'व्हॉइस'द्वारे याहूची मेसेंजर चालविली जाते. 'जजाह' या व्हीओइपी प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉइस सेवा चालविली जाते. टेलिफोनिका युरोप बीव्ही या कंपनीने 2010 मध्ये 'जजाह' खरेदी केले होते.
हॅकिंगचा दावा करणाऱ्या ग्रुपची वेबसाईटनंतर मात्र उपलब्ध होत नव्हती. दरम्यान, हा जागरुकतेचा प्रयत्न असून, याहूला याद्वारे कोणताही इशारा आम्ही देऊ इच्छित नाही, असे या हॅकर्सने म्हटले आहे.