इतक्यात निवृत्त होणार नाही- सचिन

बांग्लादेशात आपलं शंभरावं शतक साजरं करून सचिन तेंडुलकरने त्याच्या निवृत्तीची मागणी करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. मी जेव्हा निवृत्ती घेईन, तेव्हा मी सगळ्यांना सांगूनच ती घेईन असं अश्वासन सचिनने दिलं आहे.

Updated: Mar 17, 2012, 11:35 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

बांग्लादेशात आपलं शंभरावं शतक साजरं करून सचिन तेंडुलकरने त्याच्या निवृत्तीची मागणी करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. मी जेव्हा निवृत्ती घेईन, तेव्हा मी सगळ्यांना सांगूनच ती घेईन असं अश्वासन सचिनने दिलं आहे. आपण इतक्यात निवृत्त होणार नसल्याचंही सचिनने स्पष्ट केलं आहे.

 

मी देव नसून सामान्य माणूस आहे आणि मी रेकॉर्डसाठी खेळत नाही असं सचिनने नम्रपणे म्हटलं आहे. याचवेळी सचिनने आपल्या निवृत्तीबद्दल खुलासा केला आणि सांगतले की मी जेव्हा निवृत्ती घेण्याचं ठरवेन, तेव्हा ते इतरांना सांगेनच. यावेळी सचिनने आपल्या महाशतकाबद्दल म्हटले की महाशतकाची उत्कंठा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना होती. मी कुठेही गेलो तरी मला सगळे जण महाशतक कधी पूर्ण होणार याबाबत विचारायचे. या गोष्टीचं मनावर प्रचंड दडपण होतं. या टेन्शनमुळे माझं ५० किलो वजन कमी झालं असंही सचिन गमतीत म्हणाला.

 

सचिनने बांग्लादेशविरूद्ध शतक ठोकत सगळ्यांचा डोळ्याचे पारणे फेडले, सचिन महाशतक करणार की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. वनडे आणि टेस्ट मिळून सचिनने १०० शतकांचा असा पल्ला गाठला. शतकांचा शतकवीर अशी बिरूदावली आज त्याला खऱ्या अर्थाने शोभते आहे. गेले वर्षभर तो एकही शतक करू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती मात्र आज त्याने आपल्या बॅटने सगळ्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.