टीम इंडियाचा दणदणीत पराभव

भारत आणि श्रीलंका मॅच सीरिजमधील दुसरी वन-डे आज हम्बान्टोटामध्ये रंगतेय. पहिल्या वन-डेमध्ये विजय मिळवून भारतानं सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतलीय. हीआज टीम इंडियाची जमेची बाजू ठरतेय.

Updated: Jul 25, 2012, 09:36 AM IST

www.24taas.com, हम्बान्टोटा

 

दुस-या वन-डेमध्ये श्रीलंकेनं टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. भारतानं ठेवलेलं 139 रन्सचं आव्हानं लंकन टीमनं सहज पार केलं. श्रीलंकन टीमने ९ विकेट्सनी भारतावर विजय मिलवला. या विजयासह लंकन टीमनं पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली आहे.

 

पहिल्‍या वनडेमध्‍ये 314 धावांचा डोंगर उभा करणा-या टीम इंडियाची फलंदाजी दुस-या सामन्‍यात फ्लॉप ठरली. टीम इंडियाच्‍या सात फलंदाजांना तर दुहेरी आकडा सुद्धा गाठता आला नाही. थिसारा परेरा आणि अँजेलो मॅथ्‍यूजच्‍या घातक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे कागदी वाघ अक्षरश: नामोहरम झाले. त्‍यांनी मैदानात फक्‍त हजेरी लावण्‍याचे काम केले.

 

वीरेंद्र सेहवागने सलामीवीर फलंदाज तिरकरत्‍ने दिलशानला एक जीवदान दिले. इरफान पठाणच्‍या गोलंदाजीवर त्‍याने दिलशानचा सोपा झेल सोडला. यापूर्वी अनुभवी गोलंदाज झहीर खानने एकाच षटकात पाच वाईड चेंडू टाकले होते. भारत आणि श्रीलंका मॅच सीरिजमधील दुसरी वन-डे आज हम्बान्टोटामध्ये रंगतेय. पहिल्या वन-डेमध्ये विजय मिळवून भारतानं सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतलीय. भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच क्रमांकावर बॅटींगला आलेला गंभीर शेवटपर्यंत चिकाटीनं खेळत राहिला. पण, ३३ व्या ओव्हरला शेवटी मलिंगानं त्याला टीपलाच. ही दहावी विकेट होती. ३३.३ ओव्हर्समध्येच भारताचे सर्व खेळाडू बाद झाले त्यांनी १३८ रन्सचं टार्गेट श्रीलंकेसमोर ठेवलं.

 

पहिल्या १० ओव्हरमध्येच भारताची दाणादाण उडालेली स्पष्ट दिसत होती. त्यानंतरही स्थिती फारशी बदलली नाही.  सुरुवातीपासून  टिकून राहिलेल्या गंभीरला मात्र म्हणावी अशी साथ मिळाली नाही. सेहवाग ३१ रन्स काढून आऊट झाला तर सुरेश रैनानं ४१ रन्स दिले.  विराट कोहलीनं ३३ तर रोहित शर्मानं ३८ रन्स केले. पण, म्हणावा असा खेळ कुणीही करू शकलं नाही. कॅप्टन महेंद्रसिंग धोनी ११ रन्स देऊन आऊट झाला.

 

भारताची दाणादाण :- (बाद झालेले खेळाडू आणि त्यांचे रन्स)

१. विरेंद्र सेहवाग  -  ३१ रन्स

२. विराट कोहली   -  ३३ रन्स

३. रोहित शर्मा  -  ३८ रन्स

४. सुरेश रैना  -  ४१ रन्स

५. महेंद्रसिंग धोनी   -  ११ रन्स

६. इरफान पठाण  -  ६ रन्स

7. आर. आश्विन  -  २१ रन्स

८. झहीर खान  - २ रन्स

९. प्रग्यान ओझा - ५ रन्स

१०. गौतम गंभीर - ६५ रन्स

 

भारतीय संघ

गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, विराट कोली, रोहित शर्मा, सुरेश रैना, महेन्द्रसिंग धोनी (कॅप्टन), इरफान पठाण, रविचंद्रन आश्विन, झहीर खान, उमेश यादव, प्रग्यान ओझा

 

श्रीलंका टीम

तिलकरत्ने दिलशान, उपूल थरंगा, कुमार संघकारा, दिनेश चांदीमल, महेला जयवर्धने (कॅप्टन), अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरीमाने, थिसारा परेरा, लासिथ मलिंगा, रंगना हेराथ, इसुरू उडाना

 

.