www.24taas.com, मुंबई
दादर पारसी झोराष्ट्रीयन क्लबनं नॉट आऊट ८६ वर्ष पूर्ण केले आहेत. भारताला दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत यांसारखे अनेक दिग्गज क्रिकेटर या क्लबनं दिले आहेत. क्रिकेट जगतात विनामूल्य कोचिंग देणारा हा एकमेब क्लब आहे.
भारताच्या माजी क्रिकेटर्सनी या क्लब बाबत व्यक्त केलेली कृतज्ञता हीच पुरेशी आहे. दादर पारसी झोराष्ट्रीयन क्लबची खास महती सांगण्याची गरज नाही. माधव मंत्री, दिलीप वेंगसरकर, चंदू पंडित, लालचंद राजपूत याशिवाय भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज या क्लबनं दिले आहेत. तर मुंबईचे अनेक रणजीवर ही दापाझोचेच आहेत.
क्रिकेट जगतात विनामूल्य प्रशिक्षण देणारा आणि खेळासाठी कोणतीही फी न आकारणारा केवळ मुंबईतला एकमेब क्लब म्हणून माटुंग्याच्या दापाझोची ओळख. पूर्वी झोपडी नावानं जाणाऱ्या क्लबनं मुंबईच्या क्रिकेटसाठीही बराच संघर्ष केला आहे.
मुंबईतून मोकळ्या मैदानांची संध्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. स्थानिक क्रीडा संघटकांमुळे काही मैदाने टिकली त्यापैकीच एक दापाझोचं मैदान. या क्बलनं नॉट आऊट ८६ वर्ष पूर्ण केली आहेत. आतापर्यंतच्या सुवर्णमयी कारकिर्दीत मुंबईला आणि देशाला अनेक क्रिकेटर्स दिले आहेत. आणि यापुढेही देशाला या दापाझोमधून अनेक क्रिकेटर्स मिळतील यात शंका नाही.