www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
एखाद्याने पैसै खाल्ले असे आपण सहज म्हणतो ऐकतो.. पण औरंगाबादच्या संतोष जाधव याने हे प्रत्यक्ष करुन दाखवलय.. 25 हजारांची लाच घेताना हा पठ्ठा रंगेहाथ पकडला गेला आणि पुरावे मिटवण्याच्या नादात त्यानं चक्क 1000 रुपयांची नोटच गिळली.
संतोष जाधव या औरंगाबादच्या शासकीय कर्मता-याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय. 25 हजारांची लाच घेताना त्याला एसीबी पथकानं अटक केली. मात्र या अटकेच्या वेळी त्याची एसीबीच्या पथकासोबत झटापट झाली. त्यात त्यानं चक्क एक हजार रुपयांची नोटचं गिळून टाकली. गिळालेली हजाराची नोट मिळण्यासाठी लाचलुचपत खात्यानं त्याला दवाखान्यात दाखल केलं, डॉक्टरांनी नोट बाहेर काढण्याचे प्रयत्नही केले. मात्र नोट काही मिळाली नाही .. शेवटी नोट खाल्ल्याचा वैदकीय पुरावा लाचलुचपत विभागाल डॉक्टरांनी दिल्यांन त्यांचा जिवातजीव आला..
औरंगाबादमध्ये एसीबीनं आज केलेल्या कारवाईत संतोष जाधव,नामदेवर पवार, जयनंदा लोखंडे या तीन अधिका-यांना लाच घेण्याच्या आरोपावरुन अटक केली. औरंगाबादचे लाचखोर अधिकारी गजानन खाडेच्या संपत्तीनं सर्वांचेच डोळे दिपले होते. मात्र पुरावा नष्ट करण्यासाठी या शिपायनं लढवलेली शक्कल सर्वांच्याच चर्चेचा विषय होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.