तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर...

आपण काम करतो मात्र प्रसिद्धी दुसऱ्याच व्यक्तीस मिळते. आपल्य़ाला प्रसिद्धीच मिळत नाही. सर्व श्रेय दुसऱ्या व्यक्तीला मिळतं. अशावेळी मनास खूप त्रास होतो.

Updated: Jun 21, 2012, 12:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

‘मरावे परि कीर्तीरूपे उरावे’ असं म्हटलं जातं. आयुष्यात संपत्ती मिळवण्याइतकंच लोकांच्या मनात आणखी एक स्वप्न असतं. ते म्हणजे नाव कमावणं. आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी सुप्त इच्छा सर्वांच्याच मनात असते. मात्र, प्रसिद्धी प्रत्येकाच्याच नशिबात असते, असं नाही. त्यामुळे काही लोक तर ‘येन केन प्रकारेण’ प्रसिद्धी मिळावी, यासाठी वाट्टेल त्या गोष्टी करत असतात.

 

मात्र, योग्य कामांद्वारे आपलं नाव लोकांपर्यंत पोहोचावं अशी इच्छा असणं गैर नाही. तसंच, चांगलं नाव कमावणं हे कुटुंबासाठी नेहमीच लाभदायक असतं. पण, बऱ्याचवेळा असं होतं, की आपण काम करतो मात्र प्रसिद्धी दुसऱ्याच व्यक्तीस मिळते. आपल्य़ाला प्रसिद्धीच मिळत नाही. सर्व श्रेय दुसऱ्या व्यक्तीला मिळतं. अशावेळी मनास खूप त्रास होतो. आपल्याला योग्य प्रसिद्धी आणि यश मिळावं असं वाटत असेल तर सूर्यमंत्राचा जप करावा.

 

मंत्र

 

ऊँ भास्कराय नम:

 

विधी

 

रोज सकाळी स्नान करून देवासमोर पद्मासन घालून बसावे आणि वर दिलेल्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा रोज अकरा माळा जप केल्यास लवकरच तुमचं नाव सर्वतोमुखी होईल. तसंच तुमच्या चांगल्या कामाचं श्रेयही तुम्हालाच मिळेल.