नवी दिल्ली : घर बांधण्याआधी दिशांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलायं. जाणून घ्या कोणत्या दिशेला घर असावे
पश्चिम दिशा - पश्चिम दिशेचा स्वामी वरुण देव आहे. घर बांधताना या दिशेला काही रिक्त ठेवू नये. ही दिशा वास्तुशास्त्रानुसार शुभ असल्याने घरात मान सन्मान, प्रतिष्ठा, सुख आणि समृद्धता येते. कौटुंबिक जीवनही चांगले राहते.
वायव्य दिशा - वायु देव या दिशेचे स्वामी आहे. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा दोषमुक्त झाल्यास व्यक्तींच्या संबंध अधिक दृढ होतात. लोकांकडून सहयोग तसेच आदर सन्मान मिळतो.
उत्तर दिशा - वास्तुशास्त्रात उत्तर दिशेलाही पूर्व दिशेसमान शुभ मानले जाते. या दिशेचा स्वामी कुबेर आहे. ही दिशा वास्तुदोष मुक्त असल्यास घरात धनसंपत्तीमध्ये सतत वृद्धि होते. घरात सुख नांदते. मात्र या दिशेला वास्तुदोष असल्यास आर्थिक स्थिती कमकुवत होते. कमाईपेक्षा खर्च अधिक वाढतो.
ईशान्य दिशा - या दिशेचे स्वामी ब्रम्हा आणि शंकर आहेत. घराचे दरवाजे आणि खिडक्या ईशान्य दिशेला असणे शुभकारक मानले जाते. या दिशेला वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या मन आणि बुद्धीवर होतो. तसेच सतत समस्यांचा त्रास जाणवतो. मात्र ही दिशा वास्तुदोष मुक्त झाल्यास घरात शांती आणि समृद्धीचा वास करते. मुलांबाबतही शुभ घटना घडतात.