www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘टायटानिक’ फेम हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डी-कॅप्रियो नव्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला भारतात दिसण्याची शक्यता आहे. लिओनार्डोचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ हा सिनेमा क्रिसमसच्या मुहूर्तावर भारतात प्रदर्शित होणार आहे.
याच सिनेमाच्या वितरण टीमपैकी एका सूत्रानं लिओनार्डोच्या भारत यात्रेचे संकेत दिलेत. लिओनार्डोची भारत भेट त्याच्या सिनेमासाठी चांगलीच फायदेशीर ठरू शकते, हे काही वेगळं सांगायला नको. या यात्रेदरम्यान तो काही उद्योन्मुख उद्योजकांच्याही भेटीगाठी घेणार आहे. लिओनार्डोच्या मते त्याच्या या सिनेमातील त्याचं पात्र तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
छोट्या छोट्या उद्योजकांसोबत भारत पुढे वाटचाल करतोय, हे लिओनार्डोलाही माहीत असावं... त्यामुळेच त्यानं आपल्या सिनेमाच्या प्रचारासाठी उद्योजकांच्या भेटींचाही प्लान आखलाय.
‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या सिनेमाचं दिग्दर्शन मार्टिन स्कोरसिस यांनी केलंय. या सिनेमाचं भारतात वितरण पीव्हीआर पिक्चर्स आणि एमव्हीपी एन्टरटेन्मेंटकडून केलं जाणार आहे. भारतात मात्र, लिओनार्डोच्या स्वागताची तयारी सुरूही झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.