www.24taas.com, झी मीडिया, हिस्सार
मल्लिका शेरावत एका शुटींगच्या निमित्ताने तिच्या स्वतःच्याच गावात पोहोचली. हरयाणातल्या तिच्या या गावात शुट करताना ती चक्क तिच्या पारंपरिक वेशात पाहायला मिळालीच एवढचं नाही तर तिने चक्क शेतीची कामंही केली.
हीस्सारच्या या खेडेगावातल्या फार्म हाऊसमध्ये मल्लिका शेरावत एका रिऐलिटी शोचं शूट करत आहे. हे फार्महाऊस तिच्या काकांचंच आहे. त्यामुळे तिच्या या गावात मल्लिका एकदम हरयाणवी वेशात पाहायला मिळाली. तिने शेतीत काम केलं. भाज्या गोळा केल्या, ट्रॅक्टर चालवला, गायीचं दूध काढलं, आणि गायींसाठी चाराही कापला,. मल्लिका खरं म्हणजे तिच्या मूळ गावी शूट करणार होती. मात्र तिथे जमलेल्या गर्दीमुळे अखेरीस तिला तिला या फार्म हाऊसमध्ये शूट करावं लागलं.
मल्लिकाच्या शूटसाठी तिचं संपूर्ण कुटुंबच पोहोचलंय. या निमित्ताने तिने खाप आणि भ्रूण हत्याविरोधात संदेश दिलाय. विशेष म्हणजे मल्लिकाला पाहायला उसळलेल्या गर्दीचा फायदा तिथल्या पाकीटमारांनाही झाला. मल्लिकाच्या वडिलांचंच पाकीट कोणीतही चोरलं, तर युनिटमधल्या एकाचा स्मार्टफोनही कोणीतरी लांबवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.