www.24taas.com, मुंबई
‘म्हैस’ ही साहित्यकृती न वाचलेला माणूस तसा दुर्मिळच... आज पुल देशपांडे यांची ९३ वी जयंती... आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या ‘म्हैस’ साहित्यकृतीची आठवण होण्याचं कारण म्हणजे लवकरच ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीय.
म्हैस... पुल देशपांडे यांच्या अनेक गाजलेल्या साहित्यकृतींपैकी एक... १९५७ साली घडलेली म्हशीची ही कथा... मुंबई-गोवा महामार्गावर पुलंच्या बससमोर एक म्हैस आडवी जाते आणि त्यानंतर होणाऱ्या सावळ्या गोंधळाचं चित्रण पुलंनी केलं ते खास त्यांच्या शैलीत... आज इतक्या वर्षांनी या कथेची आठवण होण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा पुलंच्या या साहित्यकृतीने वैभव मांगले, संतोष पवार, रमेश देव यांच्यासोबत अनेक कलाकारांना प्रेमात पाडलंय. ‘चांदी’ या सिनेमातून पुलंची ‘म्हैस’ हे सर्वजण दृश्यरुपात प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘चांदी’ या सिनेमात या सर्वांच्या प्रमुख भूमिका आहेत... आणि त्यांच्या जोडीला आहेत अनेक विनोदवीर.
पुलंचं साहित्य म्हणजे विनोदाचा एक्का आणि म्हणूनच जेव्हा ‘म्हैस’ कथेवर आधारित चांदी सिनेमाचं शूटींग सुरु झालं तेव्हा पासून कलाकारांनीही धमाल-मस्ती करतच हे शूटींग पूर्ण केलं. आता पुलंची ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकायला सज्ज झालीय... सो वेट अँण्ड वॉच…