www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये नेहमी गॉसिप्स ऐकायला मिळते. रणबिर कपूर आणि दीपिका पदुकोणची चर्चा होती. त्यानंतर प्रियांका चोप्राचे नाव जोडले जात होते. त्याआधी करिनाच्या नावाची चर्चा झाली. आता तर रणबिर कपूरचे गुटर गू कॅटबरोबर असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. दोघे सध्या दुबईत फुलटू मस्ती करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कतरिना कैफ सध्या कुठे आहे, असा प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जात आहे. मात्र, कतरिना तिचा मित्र रणबिर कपूरसोबत दुबईत आहे. रणबिर कपूर आणि कतरिना कैफ यांची लव्ह स्टोरी अशा मोडवर आहे, की त्यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती मिळणे कठीण आहे.
हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडालेले आहेत. मात्र, आपल्या प्रेमात असतानाही दोघांपैकी एकानेही याबाबत उच्चार केलेला नाही. ते दोघे अनेकवेळा डेटिंगवर जात असल्याचे वृत्त येत होते. तर दुसरीकडे कतरिना रणविरवर नाराज असल्याचे बोलले जात होते. दीपिका पदुकोण आणि रणविर यांच्या संबंधांमुळे कॅटरिना दुखावली गेली होती.
काही दिवसांपूर्वी कतरिनाने रणबिर कपूरची आई नितूसिंग यांची भेटही घेतली होती. यावेळी दोघींमध्ये बरीच चर्चा झाली. दोघींमध्ये चांगली मैत्री झाल्याचे कळते. कतरिनाने कित्येकवेळा कपूर कुटुंबीयांसोबत डिनर केल्याचेही समजते. आता तर दुबईत दोघे एन्जॉय करत असल्याने त्यांची लव्ह स्टोरी कोणत्या मोडवर आलेय ते तुम्ही आता समजून घ्या, एव्हढेच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.