सलमानची बहिण लवकरच चढणार बोहल्यावर...

बॉलिवूडचा दबंग खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ खटल्यातील अडचणी वाढल्या असल्या तरी तो आपल्या बहिणीसाठी भलताच खूश आहे. सलमानची छोटी बहिण आणि फॅशन डिझायनर अर्पिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 12, 2014, 10:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा दबंग खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ खटल्यातील अडचणी वाढल्या असल्या तरी तो आपल्या बहिणीसाठी भलताच खूश आहे. सलमानची छोटी बहिण आणि फॅशन डिझायनर अर्पिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजतंय.
अर्पिता लवकरच तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मा यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. येत्या वर्षात या दोघांचं लग्न होईल, अशा चर्चांणा उधाण आलंय. आयुष शर्मा हा दिल्लीला राहतो. अर्पिताच्या कुटुंबीयांनीही या दोघांच्या लग्नाला हिरवा सिग्नल दिलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता आणि आयुष आपल्या नात्याविषयी गंभीर आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या नात्याला नाव आणि समाजमान्यता देण्याचा निर्णय घेतलाय. आयुष बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून अनेकदा आयुष आणि अर्पिता यांना एकत्र वांद्र्यात पाहिलं गेलंय. नुकतंच, दोघांचेही कुटुंबीय एकत्र सुट्टी घालवण्यासाठी शिमल्यालाही गेले होते.
अर्पिता हिला सलमानचे वडील सलीम खान आणि सावत्र आई हेलन यांनी दत्तक घेतलंय. याशिवाय सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अल्विरा ही चार मुलं आहेत. अल्विरा हिनं अभिनेता-दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री याच्यासोबत विवाह केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.