www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिलीप कुमार आणि मधुबाला... प्रेक्षकांच्या हृद्यात अढळ स्थान मिळवलेल्या या जोडीच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात मात्र होऊ शकलं नाही... पण, मधुबालाच्या वडिलांनी या नात्याला व्यवहारिक रुप देण्याचा प्रयत्न केला नसता तर आजचं कदाचित वेगळं असतं... असं खुद्द दिलीप कुमार यांनी ‘दिलीप कुमार : द सबस्टेन्स अॅन्ड द शॅडो’ या आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय.
आपल्या करिअरची दोरी दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायला, दिलीप कुमार यांच्या मनानं मान्य केलं नाही, हेच कारण ठरलं मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात तणाव निर्माण होण्याचं... मधुबालासोबतचा या सगळ्या प्रवासाचा दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केलाय.
1951 मध्ये मधुबाला यांच्यासोबत पहिल्यांदा ‘तराना’मध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना एक चांगली कलाकार आणि ‘जीवनाविषयी आत्मियता असणारं एक जिंदादिल व्यक्तीमत्त्व’ असं म्हटलंय. हे हाऊस द्वारे प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय. ‘मी हे स्वीकार करतो की मधुबालाकडे मी एक सहकलाकार आणि एक चांगली व्यक्ती अशा दोन्ही रुपातील आकर्षिणात बांधलो गेलो होतो. तिच्यात ते सगळेच गुण होते, ज्याची एका महिलेकडे असण्याची आशा त्यावेळेस होती. तीचं व्यक्तीमत्व खूपच जिवंत होतं त्यामुळेच माझं लाजिरवाणा आणि संकोची स्वभाव कोणत्याही प्रयत्नांशिवाय सहज दूर झाला’
दिलीप-मधुबालाची जोडी प्रेक्षकांना भावल्यामुळे ‘मुगल ए आजम’ या चित्रपटाच्या शूटींग दिग्दर्शक के. आसिफ खूपच खुश होते. दिलीप यांच्याविषयी वाटणारं प्रेम मधुबालानं आसिफसमोरही व्यक्त केलं होतं. पण, याच दीर्घकाळ चाललेल्या या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मधुबाला आणि दिलीप यांच्यातील नातं ताणलं गेलं होतं.
त्या दिवसांच्या आठवणीत दिलीप लिहितात, ‘आमच्या संबंधातला गोडवा निघून जात असल्याची चाहूल जेव्हा मला लागली तेव्हा आसिफनं हे नातं पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले. ते मधुबालासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करत होते पण भलं होवो मधुबालाच्या वडिलांचं ज्यांनी आमच्या होणाऱ्या लग्नाचा व्यावहारिक संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.’
सिनेमाच्या शूटींगदरम्यान हे नातं खूपच ताणलं गेलं होतं. दिलीपकुमार लिहितात, ‘जेव्हा मुगल-ए-आझमचा प्रसिद्ध मोरपंखाचा सिन शूट होतं होता तेव्हा तर दोघांमध्ये साधं बोलणंही बंद झालं होतं. या दृश्यात शूटींग दरम्यान जेव्हा आमच्या दोघांच्या ओठांदरम्यान केवळ ते मोरपंख होतं, तेव्हा आमच्यातल्या संभाषणाचा शेवट झाला होता. एव्हढंच काय आम्ही एकमेकांना दुआ-सलामही करत नव्हतो’… हे दृश्यं म्हणजे केवळ दोन पेशेवर कलाकारांचा अंदाज आणि कलेच्या प्रती समर्पणाचं प्रतीक आहे. ज्यामध्ये दोघांनी आपापले खाजगी वाद बाजूला ठेऊन दिग्दर्शकाच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं.
मधुबालाचे पिता अताउल्लाह खान यांची स्वत:ची सिनेनिर्माण कंपनी होती आणि ते एकमेव व्यक्ती होते ज्यांना या दोन्ही फिल्मी सिताऱ्यांना एकाच छताखाली पाहण्यात सर्वात जास्त आनंद होता. एकदा लग्न झालं की परिस्थिती सुधारेल असं मधुबाला यांना वाटत होतं. पण, दिलीप यांना मात्र आपलं करिअर दुसऱ्या कुणाच्या हाती सोपवणं मान्य नव्हतं. आपले निर्णय आपणंच घ्यावेत, यामतावर ते ठाम होते. आपण एका अशा नात्यात गुरफटलो जातोय, ज्यामध्ये आपलं हित नाही, असं दिलीप कुमार यांना वाटत होतं. यामुळेच त्यांनी लग्नाचा विषय बाजुला सारून दोघांनीही पुर्नविचार करण्याचं ठरवलं.
मधुबाला आणि त्यांचे वडिल या दोघांशीही मी अनेक वेळा साफ मनानं बोलण्याच प्रयत्न केला पण, आपल्या मनातील दुविधा समजून घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं... आणि सरते शेवटी या नात्याचा एक दु:खद अंत झाला..
या पुस्तकात दिलीप म्हणतात, ‘स्टारडमनं मला सुखापेक्षा जास्त दु:खचं दिलंय’. नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय.
*
*