www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या वर्षी ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमातून पुनःपदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने आपण सुपरस्टार असल्याचं सिद्ध केलं आहे. आता श्रीदेवीची थोरली कन्याही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरला सध्या टॉलीवूडमधून (तामिळ सिनेमा) बऱ्याच ऑफर्स येत आहेत. मात्र ती तामिळ सिनेमातून सिनेमांत पदार्पण करणार की हिंदी सिनेमांतून लोकांसमोर येणार हे आता तीच ठरवेल.
१६ वर्षीय जान्हवी सध्या अभिनयावर बरीच मेहनत घेत आहे. ती डान्सचं प्रशिक्षण घेत आहे. तसंच शब्दोउच्चारांचंही शिक्षण घेत आहे. याशिवाय जिममध्ये जाऊन आपल्या सरीराला आकार देण्यात जान्हवी गुंतली आहे. ही सर्व मेहनत ती सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी करत आहे. निर्माता बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी असणाऱ्या जान्हवीला करण जोहरच्या सिनेमाची ऑफर असल्याचं सांगण्यात येत होतं. करण जोहरनेही जान्हवीला आपणच बॉलिवूडचा पहिला सिनेमा देणार असल्याचं सांगितल्याचं समजतंय. मात्र हा सिनेमा कधी येणार आहे, हे अजून त्याने स्पष्ट केलेलं नाही. तसंच श्रीदेवीनेही आपल्या मुलीला इतक्यात सिनेसृष्टीत पाऊल ठेवू देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जान्हवीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिला सिनेमात काम करू देणार नाही, असा श्रीदेवाचा आग्रह होता.
मात्र दक्षिणेकडील सिनेमांसाठी जान्हवीला बऱ्याच ऑफर्स आल्या आहेत. त्यातील एक चिरंजीवचा मुलगा राम चरण तेजा (‘जंजीर’ सिनेमातील नायक) याच्यासोबत काम करण्याची तिला ऑफर आहे, तर दुसरी ऑफर नागार्जुनचा मुलगा नागचैतन्य याच्यासोबत सिनेमा करण्यासाठी आहे. चिरंजीवी आणि नागार्जुन हे दोघेही श्रीदेवीचे समकालीन सुपरस्टार आहेत. त्यामुळे श्रीदेवीच मुलगी या सुपरस्टार्सच्या मुलांसोबत काम करणार का, याची उत्सुकता श्रीदेवीच्या चाहत्यांना लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.