www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
इंग्लंड आणि त्यानंतर वेस्ट इंडिज या दोन्ही ठिकाणी विजयाचा डंका वाजवल्यानंतर मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचे काही खेळाडू रविवारी मायभूमीत परतले. द्विगुणित झालेला उत्साह खेळांडूच्या चेहऱ्यावर दिसत होता. येत्या झिम्बॉब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे धोनी सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय. काही भारतीय खेळाडू मायदेशी परतलेत.
'दोन महिन्यांनंतर भारतात परतल्यानंतर फारच छान वाटतयं' असं ट्विट भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माने मायभूमीत परतल्यानंतर केलंय. तसंच सलामी फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केलेल्या रोहीत शर्मा ट्विटरवर म्हणतो, 'अखेर मी मुंबईला पोहोचलो. इथे आमचं एकदम जंगी स्वागत झालं. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून छान वाटलं. दोन महिने फारच छान होते'.
टीम इंडियाने चम्पियन ट्रॉफीत इंग्लडला धूळ चारली आणि चॅंम्पियन हा खिताब पटकावला.तर वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ट्राय सिरीजमध्येही श्रीलंकेला पराभवाचा दणका देत कॅरेबिन भूमीही काबीज केली. ट्राय सिरीजमध्ये सुरवातीच्या सलग झालेल्या पराभवाने टीम इंडिया या सिरीजमधून बाहेर जाते की काय असं वाटत असताना टीम इंडियने मात्र जोरदार खेळ करत या सिरीजमध्येही बाजी मारली. त्यामुळे टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.